LIVE UPDATES

Sawantwadi Road Repair : रस्त्याच्या कामाचा दर्जा राखा

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसलेच्या अधिकाऱ्यांना सूचना ; सावंतवाडीत रस्ता दुरुस्तीचा पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 23, 2026 03:52 PM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News

सावंतवाडी : शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची नगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. मोरडोंगरी, लक्ष्मीनगर आणि तहसीलदार रोड परिसरात सध्या सुरू असलेल्या वॉटर पाईपलाईन तसेच गॅस पाईपलाईनच्या कामानंतरच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पाईपलाईनच्या कामांमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती योग्य पद्धतीने आणि दर्जेदार व्हावी, जेणेकरून नागरिकांना वाहतुकीचा किंवा पावसाळ्यात चिखलाचा त्रास होऊ नये यासाठी नगराध्यक्षांनी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा राखण्याचे आणि ती वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक, बांधकाम अधिकारी तुषार सरडे, मनोज राऊळ यांच्यासह नगरपरिषदेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.