LIVE UPDATES

तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राला ६० हजारांचे आरोग्य साहित्य

रोटरी क्लब वेंगुर्ला व झांट्ये काजूतर्फे वितरण
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 28, 2026 15:38 PM
views 24  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउन आणि झांट्ये काजू, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमारे ६० हजार रुपये किमतीचे आरोग्यविषयक साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये ५० प्रकारची विविध औषधे तसेच रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक असलेला स्ट्रेचर यांचा समावेश आहे.

 या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना अधिक दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र जन आरोग्य समिती अध्यक्ष सुजाता पडवळ, उभादांडा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, तुळस सरपंच रश्मी परब, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउनचे अध्यक्ष ॲड. प्रथमेश नाईक, डॉ. राजेश उबाळे, डॉ. दाभोलकर, काजू उद्योजक स्वप्निल झांट्ये, दीपक ठाकूर, उद्योजक योगेश नाईक, पंकज शिरसाठ तसेच तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र लिलके, जन आरोग्य समितीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते. 

  यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. रुग्णांच्या हितासाठी विविध सामाजिक संस्था, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन केलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळेकर यांनी केले.