LIVE UPDATES

मुख्याध्यापक सुनील लक्ष्मण ठाकूर यांचे निधन

शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 07:12 PM
views 24  views

कणकवली : अखिल कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष तथा उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनील लक्ष्मण ठाकूर (वय ५७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी दारिस्ते येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने कणकवली तालुक्यात शिक्षण आणि सामाजिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे.

सुनील ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात आणि विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. केवळ शालेय अभ्यासक्रमच नव्हे, तर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी जिल्हा, विभागीय तसेच राज्य पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून दिले. शाळेला डिजिटल बनवण्यात आणि विविध स्पर्धांमध्ये शाळेचा नावलौकिक उंचावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. माध्यमिक विद्यालय नाटळ माजी विद्यार्थी संघाचे ते सक्रिय पदाधिकारी म्हणूनही कार्यरत होते.