
सावंतवाडी: मळगाव ब्राम्हणआळी येथील शेतीचे रानगव्याकडून प्रचंड नुकसान झाले असून मोठ्या कष्टाने केलेल्या शेतीचं जंगली प्राण्यांकडून प्रचंड नुकसान होत असल्यामुळे येथील शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे.
वन विभागाने यात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांची आहे. यावेळी निलेश राऊळ, अनिल राऊळ, रामकृष्ण परब, विष्णू परब, विश्वनाथ राऊळ, महादेव राऊळ, गुरुनाथ राऊळ आदि उपस्थित होते.










