
कुडाळ : श्री क्षेत्र कुडाळ येथील श्री साई दरबार (नेरूर-कविलगांव, रेल्वे स्टेशन जवळ, जि. सिंधुदुर्ग) येथे बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी ‘गुरुपौर्णिमा उत्सव २०२६’ निमित्त विविध धार्मिक, सांगीतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात साईभक्तांसाठी दिवसभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले असून, परिसरातील सर्व साईभक्तांनी या उत्सवाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळी ७.०० वाजता: अभिषेक व षोडषोपचार पूजा, सकाळी १०.०० वाजता: सामूहिक ध्यान साधना सोहळा, दुपारी १२.०० वाजता: माध्यन्ह आरती, दुपारी १२.३० वाजता: शास्त्रीय व सुगम गायन / वादन (सादरकर्ते: विजयानंद म्युझिक क्लास, कुडाळ व स्थानिक कलाकार), दुपारी १.०० वाजता: महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता: शास्त्रीय व सुगम गायन / वादन (सादरकर्ते: विजयानंद म्युझिक क्लास, कुडाळ व स्थानिक कलाकार), रात्री ८.१५ वाजता: महाआरती, रात्री ९.०० वाजता भजन असे दिवसभरातील नियोजित कार्यक्रम आहेत. निवेदक: प्रा. एस. झेड नेमण सर (मातोंड-वेंगुर्ला) व अक्षय सातार्डेकर (मालवण) असणार आहेत. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.











