LIVE UPDATES

पालकमंत्री नितेश राणेंनी घेतले शिरगावच्या गणरायाचे दर्शन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 22, 2026 13:46 PM
views 54  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड :  देवगड तालुक्यातील शिरगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, अमित साटम, मिलिंद साटम, संतोष किंजवडेकर, संतोष तावडे, राजा साटम, नंदू देसाई, सुधीर साटम, राजा भस्मे, मंगेश लोके, विवेक जामसंडेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री नितेश राणे यांनी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधला.