LIVE UPDATES

पालकमंत्री नितेश राणेंची वचनपूर्ती

ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांसाठी आरक्षित लेनचा लागला फलक
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 21, 2026 17:09 PM
views 61  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली : ओसरगाव येथील टोल नाक्यावर एमएच 07 पासिंगच्या वाहनांना स्वतंत्र लेनमार्फत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी जाहीर केले होते. मात्र, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या जाहीर सूचनेत तसा उल्लेख नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र टोल कंपनीने ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग पासिंगच्या अवाणिज्य वाहनांसाठी आरक्षित लेन असल्याचा फलक प्रदर्शित केल्याने या साऱ्या शंकांवर अखेर पडदा पडला असून पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासियांना दिलेला शब्द पूर्णत्वास जात आहे .

ओसरगाव येथे सुरू होणाऱ्या टोलनाका याबाबत अधिसूचना निघाल्यानंतर पालकमंत्री नीतेश राणे यांनी २३ जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा वासियांसाठी रिटर्न गिफ्ट जाहीर केले होते. त्यानुसार ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्ग पासिंगच्या म्हणजेच एमएच 07 पासिंगच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तसेच पिवळी नंबर प्लेट असणाऱ्या जिल्ह्यातील व्यावसायीक वाहनांसाठी ५० टक्के सवलतही देण्यात येणार असल्याचे मंत्री नीतेश राणे यांनी स्पष्ट केलेले होते.