LIVE UPDATES

नगरपरिषदेच्या 'योगा सेंटर'चे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

स्वच्छ शहरासाठी अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण
Edited by: विनायक गांवस
Published on: June 14, 2026 17:38 PM
views 251  views

​सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पालिकेच्यावतीने करण्यात आले होते. यात सावंतवाडी नगर परिषदेच्या नरेंद्र डोंगर येथील जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित 'मेडिटेशन, योगा सेंटर'चे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच सावंतवाडी शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाला अधिक बळकटी देण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन कचरा संकलन वाहनांचा आणि अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही पार पडला.

   ​या सोहळ्याला माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर,  युवराज लखमराजे भोसले, मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगांवकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, अजय गोंदावळे, माजी जि.प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी नगरसेवक राजू बेग, उदय नाईक, जिल्हा बँक संचालक रवि मडगांवकर, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, दिलीप भालेकर, अभियंता तुषार सरडे, ठेकेदार प्रताप मूर्ती, मेहर पडते, संतोष पालेकर, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.