LIVE UPDATES

कुडाळ येथे माजी सैनिकांच्या हस्ते भव्य वृक्षारोपण

शाल व रोपटे देऊन वीरांचा विशेष सन्मान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 17, 2026 13:57 PM
views 47  views

​कुडाळ : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहर शिवसेना व युवासेना जिल्हा प्रमुख नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्यावतीने देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पडला.

​या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उपस्थित माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आलेले भव्य वृक्षारोपण. देशासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या या वीरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ झाडे लावून न थांबता लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला. ​कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून शिवसेना कुडाळ यांच्या वतीने सर्व माजी सैनिकांना शाल आणि रोपटे भेट देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

​"माजी सैनिकांच्या त्यागामुळे आणि समर्पणामुळेच आपण आज स्वतंत्र हवेत श्वास घेत आहोत. अशा वीरांच्या हस्ते वृक्षारोपण करून 'हरित कुडाळ' घडवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. या देशरक्षकांचा सत्कार करण्याची संधी मिळणे हे आमचे परमभाग्य आहे." या प्रसंगी माजी सैनिक शंकर मेस्त्री, सिद्धार्थ पाटील, सायमन राड्रिक्स, अनिल नाईक, लाडू शेडगे, नारायण गावडे, प्रवीण परब, भैय्या राऊळ आणि महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी सैनिक श्री. सिद्धार्थ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्यासह उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्रेया परब, तालुका प्रमुख राजन नाईक, उप तालुका प्रमुख बाळा पावसकर, युवासेना उप तालुका प्रमुख स्वप्निल शिंदे, शहर प्रमुख संतोष शिरसाट, शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, उप शहर प्रमुख शैलेश काळप, गुरु गडकर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, विनय पालकर, परब, नाना कुडाळकर, शारबिद्रे आणि सुलभा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.