LIVE UPDATES

सिंधुदुर्गात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर

सनराईज हॉस्पिटल कोल्हापूरच आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 22, 2026 14:08 PM
views 65  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील नागरिकांसाठी सनराईज हॉस्पिटल, कोल्हापूरतर्फे भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथे २७ सप्टेंबर रोजी महिला व बाल रुग्णालयात आणि कणकवली येथे २८ सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात हृदयविकार, मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे, व्हेरिकोज व्हेन्स तसेच मणक्याच्या आजारांबाबत तपासणी करून पुढील उपचार व ऑपरेशनसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना विविध उपचारांचा लाभ घेता येणार असून अँजिओप्लास्टी, लहान छिद्रातून बायपास ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेटवरील उपचार, पित्ताशयातील खड्यांवरील शस्त्रक्रिया, लेझरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार तसेच मणक्यावरील शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

याशिवाय थायरॉईड गाठी, गर्भातील गाठींसाठी उपलब्ध उपचारांबाबतही तज्ज्ञाकडून माहिती देण्यात येणार आहे. कुडाळच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग आणि कणकवलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांची शिबिराला प्रमुख उपस्थिती राहणार असून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मसुरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिबिराला येताना नागरिकांनी रेशनकार्ड, आधारकार्ड व आयुष्मानकार्ड तसेच यापूर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट असल्यास तेही सोबत आणावेत. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ८९२८७३६९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.