LIVE UPDATES

मिलिंद सदानंद पवार शाळेत गोपाळकाला उत्साहात साजरा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 18:08 PM
views 25  views

देवगड : गोपाळकाला निमित्त शाळेमध्ये मुला मुलींनी कृष्ण व त्यांचे सवंगडी, राधा, सुदामा, पेंद्या, बलराम, गोपाळ अशा विविध वेशभूषा केल्या. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर विविध गाण्यांवर छान नृत्य केले. या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

याच दिवशी शिक्षक दिन असल्याने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच श्रीकृष्णाच्या मूर्तीचे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण खडपकर व पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा शिला ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण खडपकर यांनी गोपाळकाला विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रशालेचे शिक्षक स्वप्निल सुतार यांनी विद्यार्थ्यांना गोपाळकाला विषयी छान माहिती सांगितली. तसेच प्रशालेच्या शिक्षिका प्राजक्ता मिरजकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनानिमित्त छान गोष्ट सांगून शिक्षक दिनाची माहिती सांगितली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण खडपकर, शिला ठाकूर (शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा) शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.