
सावंतवाडी : शहरातील शिरोडा नाका येथील गीता विजय देशपांडे (७६, मूळ रा. आजरा) यांचे मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी उपरल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गीता देशपांडे यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे आर्थोपेडिक तज्ञ डॉ. कश्यप देशपांडे यांच्या त्या आई होत.