LIVE UPDATES

vaibhvwadi news : खांबाळे अत्याचार प्रकरणातील चौघांना न्यायालयीन कोठडी

सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर कणकवली न्यायालयात हजर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 12, 2026 22:37 PM
views 68  views
#kokansadlive#news update#konkan update#

वैभववाडी :  विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या खांबाळे येथील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (ता. १२) त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.

 तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आला.या प्रकरणी पीडित महिलेने ६ ऑक्टोबर रोजी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार विक्रांत रणजित पवार, अक्षय कमलाकर चव्हाण , परेश पंढरीनाथ साईल आणि तुषार सुरेश कर्पे ( सर्व रा. खांबाळे, ता. वैभववाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संशयित आरोपींना (७ ऑक्टो.) न्यायालयात हजर केले सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.या कालावधीत पोलीसांनी महत्त्वाची माहिती जमा केली आहे. आज सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर चारही संशयितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.