
सिंधुदुर्गनगरी : भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवून राहतात त्यामुळे ही बाब अंत्यत धक्कादायक आहे त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने पोलीस अधीक्षकांमार्फत गृह मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा ऍड. रेवती राणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी महिला प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, जिल्हा उपाध्यक्षा अंकिता सरदेसाई, ऍड.सायली दुभाषी, अर्पिता पालव, अर्पिता सावंत आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की देशातील भाजपशासित राज्यांमध्ये विरोधकांना किती द्वेषाने पाहिले जाते याची कल्पना संपूर्ण देशाला आहे. आपल्या महाराष्ट्रातही काही वेगळं घडत नाही. पण आता भाजपने अतिशय खालची पातळी गाठली आहे. भाजपचे आमदार विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या पदधिका-यांच्या कार्यकत्यांच्या खासगी आयुष्यात नजर ठेवून आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक व गंभीर आहे. कालपरवा पुण्यात एक रेड टाकण्याचे प्रकरण घडले. त्यात आमचे नेते एकनाथराव खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अडकवले गेले. मागच्या आठवड्यातील हनी ट्रॅपच्या बातम्या पाहील्या तर कोणत्या संकटमोचनवर संकट ओढावले होते याची सर्वांनां कल्पना आहे. त्यामुळे तर हे कुभांड रचले गेले. मात्र यात भाजपाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मिडीया समोर डॉ. प्रांजल खेवलकर यांचे खासगी जीमेल अकाऊंट माध्यमांना समोर दाखवले. ड्राईव्हमधील खासगी गोष्टी बाहेर दाखवल्या. एखादया व्यक्तीची परवानगी न घेता त्या व्यक्तीच्या खासगी अकाऊंटमध्ये घुसून ते बाहेर प्रसारित करणे हा सायबर क्राईम तर आहेत शिवाय दडपशाहीचा नवा फंडा आहे.
आम्ही विरोधी पक्षात काम करणाऱ्या महिला आहोत. आम्ही विचारांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोणत्याही सत्ताधारी पक्षात न जाता निष्ठेने आदरणीय शरद पवार साहेबांसोबत काम केले आहे. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांच्या कृतीमुळे आमच्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उदया यांच्या विराधात बोलतोय म्हणून हे लोक आमच्याही फोनमध्ये घुसतील आमचेही खासगी फोटो बाहेर दाखवतील यांचा काहीही नेम नाही. लाडक्या बहिणींना फक्त निवडणुकी पुरता मान असतो याची कल्पना संपुर्ण महाराष्ट्राला आली आहे. त्यामुळे आमची भीती दुर व्हावी व आम्हाला सुरक्षित बातावरणात मिळावे यासाठी समोरची व्यक्ती आमदार आहे याचा विचार न करता कोणी सायबर क्राईम करत असेल तर त्यावर गुन्हा दाखल करुन एक वेगळा संदेश द्यावा अशी आमची मागणी आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.