कोकणात कृषी शिक्षणासाठी सुवर्णसंधी

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय - जिजामाता महिला कृषी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू
Edited by: मनोज पवार
Published on: August 01, 2025 17:03 PM
views 62  views

चिपळूण : महाराष्ट्रातील पहिले खासगी स्वायत्त गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व त्यासोबतच्या विविध शिक्षण संस्थांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी पदवी व पदविका अभ्यासक्रमांत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषी, अभियांत्रिकी, कृषी, बीएड,  कला-कॉमर्स शाखांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे यांनी केले आहे.

२००१ मध्ये सुरू झालेल्या या कृषी महाविद्यालयातून आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक कृषी पदवीधर बाहेर पडले आहेत. ‘अ’ दर्जा प्राप्त या संस्थेने केवळ शैक्षणिक गुणवत्ता नाही तर सुसज्ज पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, शेतशिवार, दुग्धशाळा, अळिंबी व भाजीपाला प्रकल्प, पशुपालन केंद्र, हायड्रोपोनिक्स आणि प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण पद्धतीद्वारे राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या मांडकी-पालवण या कॅम्पसमध्ये गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, भारतातील पहिले विना अनुदानित जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, डॉ. बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. तानाजीराव चोरगे बीएड-एमएड कॉलेज, कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय  तसेच कोल्हापूर- नंदवाळ येथे आर्टस्-कॉमर्स-सायन्स कनिष्ठ तसेच वरिष्ट महाविद्यालय व आयटीआय महाविद्यालये कार्यरत आहेत.

कोकणातील मांडकी, पालवण आणि ढोक्रवली या तीन गावांच्या सीमेवर ३०० एकरांहून अधिक परिसरात वसलेल्या या शिक्षण संकुलामध्ये सहा हजार नारळ, पंधरा हजार पोफळी, चार हजार आंबा व काजू वृक्ष, तसेच भात आणि भाजीपाला लागवड केली जाते. हा सारा शेती व उत्पादन व्यवहार थेट विद्यार्थ्यांच्या सहभागातून चालतो. संस्थेचे संस्थापक कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे  पुढाकारातून ही महाविद्यालये उभी करण्यात आली आहेत. स्थापनेपासून *अ* दर्जा असणाऱ्या या महाविद्यालयांना शासन नियुक्त डॉ. पुरी समितीने देखील   'अ' दर्जा दिला असून, शिस्त, गुणवत्तापूर्ण अध्यापन, आणि प्रत्यक्ष शेतीशी जोडलेले शिक्षण यामुळे येथे घडणारे कृषी पदवीधर बाजारपेठेत मागणीस पात्र ठरले आहेत. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, तसेच सर्व प्राध्यापक व तंत्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महाविद्यालये यशस्वीपणे कार्यरत आहेत. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी 9421154594, 8975217120,  8600879426 या क्रमांकावर संपर्क साधावा. www.gncamp.org

www.jwcagri.org या संकेतस्थळांना भेट द्यावी.