
रत्नागिरी : रत्नागिरी ज्येष्ठ नागरिक शिवाजी नगर आयोजित इंटरनॅशनल लाॕन्जेव्हीटी सेंटर इंडिया, पुणे यांचे वतीने व घरडा केमिकल यांच्या सक्रिय सहकार्याने विस्मृतीचे आजार आणि डिमेन्शिया या आजारांसंबंधित शिबिराचे आयोजन दि. २९/०७/२०२५ रोजी करण्यात आले होते. इंटरनॅशनल लाॕन्जिव्हीटी सेंटर इंडिया, पुणे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने विविध बोधप्रद उपक्रम राबवित असते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. सुभाष थरवळ यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. डॉक्टर प्रमोद शाक्य, सायकोलॉजिस्ट, सिव्हील हाॕस्पिटल, रत्नागिरी यांनी विशेष करून जेष्ठांमध्ये आढळणारे विस्मृतीचे आजार आणि डिमेन्शिया या आजाराची लक्षणे त्याकरता घ्यावयाची काळजी व उपाय याबाबत माहिती दिली. त्यानंतर इंटरनॅशनल लाॕन्जेव्हीटी सेंटर इंडिया यांचे वतीने सौ. यशोदा पाध्ये, रिसर्च कॉर्डिनेटर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्रपणे टेस्ट घेऊन मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला ४० मर्यादित ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. इंटरनॅशनल लाॕन्जीवीटी सेंटर इंडिया पुणे येथून सर्वश्री सुशांत सोनवणे प्रोग्रॅम आॕफिसर, ऑर्गनायझर, नंदकुमार सकट, तंत्रसहाय्यक उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष यांनी संघाच्या वतीने आय.एल.सी. ऑफ इंडियाच्या सर्व कर्मचारी आणि डॉक्टर प्रमोद शाक्य यांचे आभार मानले. शिबिरामध्ये संस्थेतर्फे चहा, अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती.