LIVE UPDATES

निरवडेत नारळाचे झाड घरावर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान

दुर्घटनेत एकाला किरकोळ दुखापत : ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात केला पुढे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 28, 2026 19:42 PM
views 33  views

सावंतवाडी : निरवडेतील गुंडू बांदिवडेकर, बांदिवडेकरवाडी यांच्या घरावर आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास नारळाचे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावल्या असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच बांदिवडेकरवाडीतील तरुण मंडळींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पत्रे, जी.आय. ट्यूब व इतर आवश्यक साहित्याच्या साहाय्याने घर तात्पुरते सुरक्षित करण्याचे काम हाती घेतले. ग्रामस्थांनीही स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात पुढे केला असून आर्थिक तसेच वस्तूरूपाने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.