LIVE UPDATES

कणकवली हळवल फाटा येथे आयशर टेम्पो पलटी

अपघातात एक जखमी : तीव्र वळणावर हायमास्ट दिव्यांची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 20:26 PM
views 172  views

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली हळवल फाटा येथे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळहून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पो जात असताना हळवल फाटा येथील तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला. या टेम्पोमध्ये औषधांचे साहित्य असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ मंद गतीने सुरू होती. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव तसेच तहसीलदार देशांत देशपांडे यांनी घटनास्थळी पाहणी केली.

दरम्यान, हळवल फाटा येथील हे तीव्र वळण रात्रीच्या वेळी धोकादायक ठरत असून येथे कोणतीही विद्युत रोषणाई नसल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी तातडीने हायमास्ट दिवे बसविण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश उपलब्ध झाल्यास अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.