
वेंगुर्ला : डॉ. प्रणाली उर्मिला बुधाजी येरम यांनी फार्मास्युटिकल सायन्सेस (Pharmaceutical Sciences) या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांनी रत्नागिरी येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी मधून बी.फार्मसी (B.Pharmacy) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जीपॅट (GPAT – Graduate Pharmacy Aptitude Test) परीक्षा उत्तीर्ण केली आणि मुंबई येथील Prin. K. M. Kundnani College of Pharmacy मधून एम.फार्मसी (M.Pharmacy) पदवी संपादन केली. एम.फार्मसीचे शिक्षण त्यांनी फेलोशिपच्या माध्यमातून पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी SVKM's Narsee Monjee Institute of Management Studies (NMIMS) विद्यापीठाच्या Shobhaben Pratapbhai Patel School of Pharmacy and Technology Management (SPPSPTM), मुंबई येथून फार्मास्युटिकल सायन्सेस विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. पीएच.डी. शिक्षणादरम्यान त्यांना विद्यापीठाची प्रतिष्ठित Doctoral Fellowship प्राप्त झाली होती.
त्यांचे संशोधन ‘क्रॉनिक किडनी डिसीज’ (Chronic Kidney Disease – CKD) या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असून त्यांनी या क्षेत्रातील संशोधनपर लेख उच्च प्रभावांक असलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत.
हे संशोधन त्यांनी डॉ. अमिशा वोरा, असोसिएट प्राध्यापक, SPPSPTM तसेच डॉ. योगेश कुलकर्णी, प्राध्यापक व असोसिएट डीन, SPPSPTM, NMIMS, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले.
सध्या डॉ. प्रणाली उर्मिला बुधाजी येरम या SPPSPTM, नवी मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) म्हणून कार्यरत असून अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मोलाचे योगदान देत आहेत. वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक बुधाजी उर्फ उमेश एरम यांच्या त्या कन्या आहेत.












