
वेंगुर्ला : एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या संत आजमेळा वारीत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सहभाग घेत १८ किलोमीटरचा पायी प्रवास केला. या वारीत मनिष दळवी यांनी फलटण ते बरड असा पायी प्रवास करत दिंडीतील वारकरी बांधवांची भेट घेतली. मनिष दळवी दरवर्षी संत आजमेळा दिंडीत सहभागी होतात. यावर्षी ते दिंडी नं २६ मध्ये सहभागी झाले होते.










