
वेंगुर्ला : जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व थोर समाजसेवक निलेशजी सांबरे यांच्या माध्यमातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा.नं.१ येथे वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सिंधुदुर्गचे जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला सभापती शंकर घारे, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ परिवाराचे सदस्य. अँड. नकुल पार्सेकर यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या वीस वर्षांहून जास्त काळ कोकणात सामाजिक ,शैक्षणिक व आरोग्य क्षेञात सुरू ठेवलेल्या सांबरे यांच्या कार्याचे कौतुक यावेळी प्रमोद कामत यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी श्री नाईक, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष अभिजीत वेंगुर्लेकर, तरूण उद्योजक बाबा टोपले, नगरसेविका सुषमा प्रभूखानोलकर, पालक व शिक्षक उपस्थित होते.











