LIVE UPDATES

ओरोस येथे स्विफ्ट कार व दुचाकीचा भीषण अपघात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 18, 2026 17:54 PM
views 151  views

सिंधुदुर्गनगरी : मुंबई गोवा महामार्गावरील ओरोस भवानी मंदिर जवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सर्विस रोडने जात असलेल्या दुचाकीला स्विफ्ट कारची भीषण धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत तर स्विफ्ट कार मधील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.