LIVE UPDATES

अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्राच्यावतीने रोपांचे वाटप

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 01, 2026 16:10 PM
views 25  views

सावंतवाडी : अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र, सावंतवाडी यांच्यावतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक 4, सावंतवाडी येथे कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना विविध रोपांचे वाटप करून कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण तसेच वृक्ष लागवडीचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, वेंकटेश शेट यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक महेश पालव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.