
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून तळवडे येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ही ज्ञानसेवा असल्याचे उद्गार यावेळी श्री. परब यांनी काढले. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक १, २ व ४ तसेच श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भाजप युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, उपसभापती गौरव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लावण्याचा हा उपक्रम असल्याचे उपस्थितांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी हा केवळ राजकीय पक्ष नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणारी संघटना आहे. शिक्षण, आरोग्य व सामाजिक बांधिलकी जपत अशा लोकहिताच्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य भाजपच्या माध्यमातून सातत्याने सुरू राहणार असल्याचा विश्वास विशाल परब यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, उपसभापती गौरव मुळीक यांनी तळवडे जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे जिल्हा परिषद शाळा 'सुजलाम सुफलाम' करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते माजी सभापती पंकज पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य दादा परब, बाळू साळगावकर, शंकर सावंत, केतन आजगावकर, धीरेंद्र म्हापसेकर , सिद्धीश तेंडोलकर, ज्ञानेश्वर गोडकर, रवींद्र परब, सुशांत गावडे, संदीप परब, शाम शेतकर, सचिन परब, वासुदेव जाधव, प्रवीण लोके आणि विकास गावडे आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी स्वागत करत भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.











