LIVE UPDATES

विद्युत भारीत लाईन अंगावर पडून म्हैस जागीच गतप्राण

वेंगुर्ला-आडेली दाभाडीवाडी येथील घटना
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 06, 2026 15:13 PM
views 62  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला-आडेली दाभाडीवाडी येथे विद्युत भारीत लाईन अंगावर पडून म्हैस जागीच गतप्राण झाली. काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.शेतात चरुन घरी येत असताना  झाडांची फांदी विद्युत लाईनवर पडून तुटलेली तार म्हैशीचा अंगावर पडली. यात तिचा अपघाती मृत्यू झाला. यामुळे शेतकरी ‌बाळू नार्वेकर यांचे तब्बल १ लाखांचे नुकसान झाले असून अधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.