LIVE UPDATES

विद्यामंदिर कोळपे मराठी नं. १ मध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 19:07 PM
views 45  views

वैभववाडी : विद्यामंदिर कोळपे मराठी नं. १ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये, यासाठी मोफत दप्तर, वह्या, पेन व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार मिळाला असून साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.

दिलावर इसफ  यांच्या माध्यमातून राजेश नवाळे यांनी विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर व आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच ‘साई माऊली सेवा मंडळा’च्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भीमराव कांबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना करण्यात आलेली ही मदत केवळ शैक्षणिक साहित्यापुरती मर्यादित नसून त्यांच्या स्वप्नांना आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा प्रकारे पुढाकार घेणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष सुभाष माने, सचिव किशोर शिंदे, महेश फोंडके, सुधाकर पाटणकर, सुरेश माने, दशरथ शिंदे, दिलीप माने, ॲड. विशाल जाधव, विलास माने, सुनील माने, मंगेश फोंडके व किशोर माने, सहशिक्षिका श्रीमती पाटील, अंगणवाडी सेविका श्रीमती फोंडके यांच्यासह परिसरातील  ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते.