
देवगड : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोटककामते परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या विशेष दिनाचे औचित्य साधून 'श्री भगवती मित्रमंडळ, कोटककामते' यांच्यावतीने कोटककामते गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमात, कै. ओंकार रावजी खाजनवाडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, श्री. रावजी उर्फ दादा खाजनवाडकर व कुटुंबीयांच्या सौजन्याने 'श्री भगवती माध्यमिक विद्यालय, कोटककामते' या शाळेला वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला
या कार्यक्रमांना बूथ अध्यक्ष गुरुदास घाडी, मुख्याध्यापक राऊळ, दादा खाजणवाडकर, रोहित कोठरकर, हायस्कूल समिती चेअरमन संतोष मेस्त्री, सचिन दळवी, राहुल हिंदळेकर, प्रदीप पारकर, संजय जोईल, मुणगेकर सर, पाटकर आणि सचिव सचिन कोकम आदी मान्यवर उपस्थित होते.











