LIVE UPDATES

विमुक्त जाती-जमातीतील लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 28, 2026 18:25 PM
views 16  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

वैभववाडी : विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व प्रमाणपत्रांचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.नाधवडे नवलादेवीवाडी  येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
 शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक सवलती तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना विविध दाखले व प्रमाणपत्रांची आवश्यकता असते.

 ही कागदपत्रे मिळविताना नागरिकांना अडचणी येऊ नयेत तसेच शासकीय सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्यावतीने नाधवडे येथील रमेश शिवाजी शिंदे आणि संदीप अर्जुन यादव यांना पालकमंत्री राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात उत्पन्न दाखले प्रदान करण्यात आले. 

या उपक्रमामुळे विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, रिद्धी, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते , जिल्हा कृषी अधीक्षक  भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील ,सरपंच लिना पांचाळ, पंचायत समिती सदस्या सुवर्णा संसारे, साधना नकाशे, मंगेश लोके, देवानंद पालांडे,यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.