LIVE UPDATES

Devgad Hapus Mango : हंगाम सुरू व्हायच्या आधीच देवगडचा हापूस वाशी मार्केटमध्ये

गिर्ये रामेश्वरचे मिलेश बांदकर यांचा प्रयोग यशस्वी; संकष्टीच्या मुहूर्तावर पहिली पेटी रवाना
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 29, 2026 04:35 PM
views 116  views
Devgad Hapus mangoes grown by farmer Nilesh Bandkar sent to Vashi Market

देवगड : आंब्याचा हंगाम अजून दूर असतानाच देवगडच्या हापूसने बाजारपेठेत एंट्री केली आहे! तालुक्यातील गिर्ये रामेश्वर येथील प्रगतशील आंबा बागायतदार मिलेश वसंत बांदकर यांनी आपल्या बागेतील हापूस आंब्याची पहिली पेटी गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी संकष्टीच्या मुहूर्तावर वाशी मार्केटकडे रवाना केली.

हंगामापूर्वीच आंबा बाजारात पाठविण्याच्या त्यांच्या या प्रयोगामुळे कोकणातील आंबा उत्पादकांचे लक्ष वेधले गेले आहे. शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी जनार्दन अँड कंपनी (JAC) या दलालामार्फत या पेटीची विक्री होणार असून, तिला किती दर मिळतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

देवगडचा हापूस म्हणजे चव, सुगंध आणि दर्जाची खास ओळख! याच हापूसचे हंगामापूर्वी उत्पादन घेण्याचा प्रयोग मिलेश बांदकर यांनी यशस्वी केला आहे. त्यांच्या बागेतील साडेसहा डझन आंब्यांची पहिली पेटी बाजारपेठेकडे रवाना झाली असून, दोन वर्षांपूर्वीही नोव्हेंबर महिन्यात वाशी मार्केटला आंब्याची पेटी पाठविण्याचा मान त्यांनी मिळविला होता. यंदा मात्र ऑक्टोबर महिन्यातच पहिली पेटी पाठवून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रयोगशीलतेची प्रचिती दिली आहे.

जूनमधील मोहोराचे संगोपन; ऑक्टोबरमध्ये हापूसचे उत्पादन!

बांदकर यांच्या बागेतील काही आंबा कलमांना जून महिन्यातच मोहोर आला होता. या मोहोरापासून फळधारणा होऊन आंब्याचे उत्पादन मिळावे, यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतली. मोहोर आलेल्या चार ते पाच कलमांना प्लास्टिक कागदाचे आवरण घालून संरक्षण देण्यात आले. त्याचबरोबर वेळोवेळी आवश्यक फवारण्या करून मोहोर आणि फळांची निगा राखण्यात आली. योग्य व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ऑक्टोबर महिन्यातच हापूस आंब्याची पहिली पेटी काढणे शक्य झाले.

दिवाळी पाडव्याला आणखी सहा ते सात पेट्या!

पहिल्या पेटीच्या यशानंतर बांदकर यांनी पुढील उत्पादनाचेही नियोजन केले आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आणखी सहा ते सात पेट्या काढण्याचा त्यांचा मानस आहे. या पेट्या प्रत्येकी पाच डझन क्षमतेच्या असतील, अशी माहिती मिलेश बांदकर यांनी दिली. त्यामुळे वाशी मार्केटमध्ये पहिल्या पेटीला मिळणारा दर आणि त्यानंतरच्या पेट्यांच्या विक्रीकडे आंबा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

बांदकर बंधूंच्या एकत्रित प्रयत्नांना यश

मिलेश बांदकर हे विजयदुर्ग विभागातील प्रगतशील आंबा बागायतदार असून, बंधू विद्याधर बांदकर यांच्यासोबत ते आंबा व्यवसाय करतात. बागेचे व्यवस्थापन, उत्पादनाचे नियोजन आणि आंब्याच्या संगोपनासाठी त्यांना वडिलांची तसेच भावाची मोलाची साथ मिळते. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळेच आंबा उत्पादनात नवनवीन प्रयोग करणे आणि त्यातून यश मिळविणे शक्य होत असल्याचे मिलेश बांदकर यांनी सांगितले.

हंगाम सुरू होण्यापूर्वीच देवगडचा हापूस वाशीच्या बाजारपेठेत दाखल झाल्याने गिर्ये रामेश्वरसह विजयदुर्ग विभागातील आंबा बागायतदारांमध्ये या प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे. पारंपरिक आंबा हंगामाच्या कित्येक महिने आधी उत्पादन घेण्याचा बांदकर यांचा प्रयत्न यशस्वी ठरल्याने आगामी पेट्यांना बाजारपेठेत किती दर मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


ताजी बातमी

View all

सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाजी
October 29, 2026
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ड्रेनेज टाक्या ओव्हरफ्लो
October 29, 2026
Meenakshi Shinde resigns as Shiv Sena women’s wing district chief amid the Pradeep Purnekar murder case controversy
मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा, ठाण्यात शिंदे-ठाकरे गट आमने सामने
October 29, 2026
घुंगुरकाठी साहित्य संमेलनात ‘शब्दांगण’ ग्रंथ प्रदर्शन
October 29, 2026
संबंधित बातम्या

View all

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ड्रेनेज टाक्या ओव्हरफ्लो
October 29, 2026
घुंगुरकाठी साहित्य संमेलनात ‘शब्दांगण’ ग्रंथ प्रदर्शन
October 29, 2026
नव्या नळपाणी योजनेचे टेस्टिंग पूर्ण होईपर्यंत जुनी जलवाहिनी सुरू ठेवा
October 29, 2026
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग जनजागृती
October 29, 2026