
कुडाळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने भ्रष्टाचार मुक्त देश बनवण्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती व्हावी, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे, याकरिता लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग च्यावतीने कुडाळ हायस्कूल जूनियर कॉलेज कुडाळ येथे अंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता भ्रष्टाचार एक सामाजिक समस्या या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी जुनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री, वराटे, उपमुख्याध्यापक रंजन तेली व नारायण साळवी, प्रशाळेचे शिक्षक गोविंद पवार, साळवी यांच्या तसेच संस्थेच्या सहकार्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपधीक्षक संगीता पाटील, पोलीस निरीक्षक विद्या जाधव, पोलीस निरीक्षक दीपक माळी व सहकारी यांनी उपस्थित राहून निबंध स्पर्धा पार पाडली.
निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अनुष्का संतप्रसाद परब, द्वितीय क्रमांक कोमल विनोद प्रभू, तृतीय क्रमांक लावण्या प्रशांत मेस्त्री, तसेच उत्तेजनार्थ म्हणून सांगवी पांडुरंग सरमळकर यांना बक्षीसे व प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावर्षी भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह 26 ऑक्टोंबर ते दिनांक 1 नोव्हेंबर या मदतीत साजरा करण्यात येत आहे. संकल्पना आहे 'सत्य निष्ठेतून समृद्धीकडे ' भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि देशासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपली सत्यनिष्ठा हीच आपल्या समृद्ध समाजाची खरी ताकद आहे हे दाखवून द्या आणि निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधा. लाचलूचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग मध्ये संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064, संपर्क क्रमांक 02362 -222289, तसेच व्हाट्सअप क्रमांक 9922891064 यावर संपर्क साधण्याचे जाहीर आवाहन देखील करण्यात आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








