LIVE UPDATES

Devgad Hapus Mango : वाडातरच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये रवाना

शेतकरी वीरेंद्र कांबळी यांचा हंगामातील श्रीगणेशा; शहा अँड बाटे फर्ममार्फत सहा डझन आंबे पाठविले
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 29, 2026 06:50 PM
views 376  views
First six-dozen box of Devgad Hapus mangoes from farmer Virendra Kambli’s orchard in Wadatar, sent to Vashi Market.

देवगड : देवगड तालुक्यातील वाडातर येथील शेतकरी वीरेंद्र दत्तात्रय कांबळी यांच्या बागेतील हापूस आंब्याची सहा डझनची पहिली पेटी गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटमध्ये रवाना झाली. शहा अँड बाटे या फर्ममार्फत त्यांनी ही पेटी बाजारपेठेत पाठविली आहे.

कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाची चाहूल लागली असून, वाडातर येथील कांबळी यांच्या बागेतून आंब्याची पेटी वाशी बाजारपेठेत दाखल होण्याच्या दिशेने रवाना झाल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हापूस आंब्याला बाजारपेठेत कसा दर मिळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.