LIVE UPDATES

सावंतवाडी पोलीस ठाण्यासह तीन ठिकाणी सहा सिमेंट बेंचेस

उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांचा पुढाकार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 08:26 PM
views 90  views

सावंतवाडी : ज्येष्ठ नागरिक तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्यात विविध कामांसाठी येणाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून सहा सिमेंटचे बेंचेस बसवून दिले आहेत. या कार्याबद्दल सावंतवाडी परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी अनेकदा पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना तासनतास उभे राहावे लागते आणि मोठा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन ॲड. निरवडेकर यांनी पुढाकार घेतला. सावंतवाडी पोलीस स्टेशन परिसर, श्रमविहार कॉलनी आणि जुस्तीन नगर या भागांत हे सिमेंटचे बेंचेस बसवण्यात आले आहेत. या बैठक व्यवस्थेमुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना, तसेच कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या या तत्पर आणि जनहितैषी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.