
कुणकेश्वर : पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पाण्याअभावी भातशेती करपण्याची परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील कुणकेश्वर गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उपसभापती अमोल लोके यांनी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी माजी सरपंच महेश ताम्हणकर, गोविंद घाडी, ग्रामविकास अधिकारी गुणवंत पाटील, कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते. उपसभापती अमोल लोके यांनी कुणकेश्वर पंचायत समिती मतदार संघातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेतली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार आहे. शेतकऱ्यांना सरकार योग्य ते सहकार्य निश्चितच करेल. पालकमंत्री नितेश राणे देखील जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेत आहेत. पालकमंत्री शासन दरबारी जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देखील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतील, असे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना उपसभापतींनी दिले.










