LIVE UPDATES

कांदळवन संवर्धनाचा ध्यास घेणारे रामजी भाबल यांचे आकस्मिक निधन

तिर्लाट आंबेरी गावावर शोककळा; समर्पित समाजसेवक व पर्यावरण कार्यकर्ता हरपला
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 02, 2026 17:33 PM
views 112  views

देवगड : तिर्लाट आंबेरी गावचे सुपुत्र, समर्पित समाजसेवक आणि कांदळवन (मँग्रोव्ह) संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणारे पर्यावरण कार्यकर्ते रामजी भाबल यांचे १ सप्टेंबर रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने तिर्लाट आंबेरीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

समाजकारण, पर्यावरण संवर्धन आणि कांदळवन संरक्षणाच्या क्षेत्रात रामजी भाबल यांनी उल्लेखनीय योगदान दिले. सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पर्यावरणाबाबतची त्यांची तळमळ आणि कांदळवन संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.

त्यांच्या अकस्मात निधनाने भाबल कुटुंबावर तसेच संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून समाजकार्यातील एक अभ्यासू, ध्येयवादी आणि समर्पित व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे