LIVE UPDATES

दीपक ठाकूर यांचे अल्पशा आजाराने निधन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 02, 2026 13:22 PM
views 258  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्गनगरी : डिगस येथील रहिवासी तथा जिल्हा शासकीय रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे डायलेसिस तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले दीपक आ. ठाकूर (वय ३७) यांचे अल्पशा आजाराने गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले.दीपक ठाकूर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गेली १३ वर्षे सेवा बजावली. मनमिळाऊ, हसतमुख व परोपकारी स्वभावामुळे ते रुग्ण, सहकारी आणि परिचितांमध्ये लोकप्रिय होते. कोणत्याही व्यक्तीला मदतीची गरज भासल्यास तत्परतेने धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

ते श्री शिव प्रतिष्ठान, डिगसचे सक्रिय सदस्य होते. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या अकस्मात निधनाने डिगस परिसरासह आरोग्य विभागात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, काका-काकी, चुलत भाऊ-बहिणी, वहिनी, पुतणे-पुतणी असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने ठाकूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.