वेंगुर्ला : माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच वेंगुर्ला युवक काँग्रेस अध्यक्ष तथा शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश गणेश परब यांनी नादुरुस्त रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत लक्ष वेधले आहे. शिरोडा गावात श्री देवी माऊलीचा सहस्त्रचंडी उत्सव साजरा होणार आहे. त्यापूर्वी 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत पाठपुरवठा करून शिरोडा गावावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी श्री. परब यांनी केली आहे.
याबाबतच निवेदन आमदार दीपक केसरकर यांना त्यांनी दिलं आहे. यात म्हटलं आहे की, गावातील चीनाली ब्राम्हण ते बाजारपेठ रस्ता पूर्ण पणे खराब खड्डेमय झाला आहे.
सध्या बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांना धुरळा खावा लागत आहे. ग्राहकांना यामुळे रोग होण्याची दाट शक्यता आहे. या यापूर्वी ठेकेदाराने खड्डे बुजवण्या काम 2 वेळा काम केले आहे. पण पूर्णपणे थूक पट्टी लावण्याचे काम ठेकेदाराने केले आहे. शिरोडा गाव एकत्र येवून शिरोडा गावात देवी माऊलीचा सहस्त्रचंडी उत्सव साजरा होणार आहे. त्यापूर्वी 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत स्वतः पाठपुरवठा करून शिरोडा गावावर होणारा अन्याय दूर करावा अशी विनंती केली आहे.