
कणकवली : अत्यवस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दारिस्ते - वरचीवाडी येथील विजया कृष्णा बागवे (६५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विजया यांचा मुलगा मदन कृष्णा बागवे (४४, रा. दारिस्ते - वरचीवाडी) यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.










