
चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील शेणवडे येथील बेटकरवाडी, गावडेवाडी, बोबलेवाडी येथे दिनांक १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या वादळ पावसामुळे विजेच्या तारेवर झाडाची फांदी पडली त्या मुळे विजेचा पोल खाली पडला. येथील ग्रामस्थ गेले दोन दिवस अंधारात होते. याची तात्काळ दखल घेत भाजपा रत्नागिरी दक्षिण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर यांनी महावितरण कंपनीच्या श्री. गोरे आणि इतर वायरमन यांच्याशी संपर्क साधून जलदगतीने वीजपुरवठा चालू करण्यास पुढाकार घेतला. त्यामुळे ग्रामस्थांचा दसरा प्रकाशमय झाला.
सहदेव बेटकर म्हणजे तळागाळातील लोकांच्या हाकेला धावून जाणारे नेतृत्व आहे. स्वतः गरजू लोकांना मदतीचा हात देतात. अशीच तत्परता त्यांनी संगमेश्वर तालुक्यातील शेणवडे येथील बेटकरवाडी, गावडेवाडी, बोबलेवाडी येथील ग्रामस्थांच्या बाबतीत दाखवत त्यांना सहकार्य केले. दिनांक १८ ऑक्टोबर रोजी अचानक झालेली वादळी वाऱ्यामुळे वीज वाहिनी झाडाची फांदी पडली.
त्यामुळे तीन वाडीतील वीज पुरवठा खंडित झाला. याची माहिती मिळताच भाजपा ओबीसी मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधत तात्काळ येतील पोल उभे करणे आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी सूचना केल्या स्वतः घटनेच्या ठिकाणी उपस्थित राहून ही सर्व कामे त्यांनी करून घेतली. त्यामुळे या वाढीतील सर्व ग्रामस्थांचा दसरा प्रकाशमय झाला. लोकनेता कसा असावा हे श्री. बेटकर यांनी दखवून दिले. याबद्दल बेटकरवाडीतील ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे आणि सहदेव बेटकर यांचे आभार मानले.
ताजी बातमी
View all










