LIVE UPDATES

मळेवाडमध्ये आजपासून सांस्कृतिक महोत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: May 01, 2026 17:21 PM
views 52  views

सावंतवाडी : युवा मित्र मंडळ व ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे यांच्या संयुक्त विद्यमाने आज १ मे ते मंगळवार ५ मे पर्यंत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन मळेवाड जकात नाका येथे करण्यात आले आहे.

या महोत्सवात शुक्रवार १ मे रोजी दुपारी "श्री सत्यनारायण महापूजा ", सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजने तसेच रात्रौ ८:३० वाजता निमंत्रित बाल गायकांची भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत गायन स्पर्धा, शनिवार २ मे रोजी, सकाळी ९ वाजता मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिर, दुपारी २:३० वाजता महिलांसाठी "हळदी कुंकू "कार्यक्रम, रात्रौ ८:३० वाजता कै. आना मेस्त्री ग्रुप, नेरूर यांचा " "नेरूर चा शिमगोत्सव " कार्यक्रम. खास आकर्षण हालते मनमोहक चित्र रथ.

रविवार ३ मे रोजी रात्रौ ९ वाजता "मळेवाड सांस्कृतिक महोत्सव" शुभारंभ. रात्रौ ९:३० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिकांची वेशभूषा, रेकॉर्ड डान्स व इतर सांस्कृतिक कार्यक्रम.

सोमवारी 4 मे रोजी रात्रौ ९ वाजता

कार्यक्रम शुभारंभ, उद्घाटन, रात्रौ ९:३० वाजता देवगड किंजवडे येथील " प्रसिद्ध समई नृत्य कलाविष्कार", रात्रौ १० वाजता "चिमणी पाखर" कुडाळ ग्रुप चा "जलवा" नृत्याविष्कार.

मंगळवार ५ मे रोजी ९ वाजता कार्यक्रम शुभारंभ, रात्रौ ९:३० वाजता" कोकण सुंदरी २०२६ " सौंदर्य स्पर्धा व लहान मुलांची "लिटल चॅम्प २०२६ " सौंदर्य स्पर्धा होणार असून या सांस्कृतिक महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवा मित्र मंडळ व ग्रामपंचायत मळेवाड -कोंडुरे सरपंच सौ. मिलन विनायक पार्सेकर व उपसरपंच हेमंत रमाकांत मराठे तथा ग्रामपंचायत अधिकारी भालचंद्र सावंत यांच्यावतीने करण्यात आले आहे.