
कणकवली : कणकवली येथे नगरसेविका मनस्वी मिथुन ठाणेकर यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. कणकवली नगरपंचायत प्रभाग क्र. १२ अंतर्गत तेली आळी – हर्णे आळी परिसरात ही विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. परिसरातील गटारे, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करण्यात आली असून साचलेला कचरा हटविण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्या मंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेत एक कदम स्वच्छता की और स्वच्छ भारत सुंदर भारत असा नारा दिला. तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी देखील या साफसफाई मध्ये विशेष मेहनत घेतली होती. या स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून स्वच्छ व निरोगी वातावरणासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबविण्याची मागणीही करण्यात येत आहे.













