LIVE UPDATES

बारावीतील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 27, 2026 11:12 AM
views 229  views
#kokansadlive#news update#konkan update#

वैभववाडी : कोकिसरे-गावठणवाडी येथील बारावीतील विद्यार्थिनी करुणा प्रकाश वळंजू (वय १७) हिचे उपचारादरम्यान ओरोस येथे निधन झाले. तिच्या आकस्मिक मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.करुणा वळंजू ही वैभववाडी येथील हेमंत केशव रावराणे विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मागील दोन दिवसांपासून तिला सर्दी व तापाचा त्रास होत होता. प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्याच दिवशी तिला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले.ओरोस येथे उपचार सुरू असतानाच तिची प्रकृती अधिक खालावली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. करुणाच्या अचानक निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली.तिच्या पश्चात आई-वडील, बहिण, भाऊ, काका असा परिवार आहे.