LIVE UPDATES

चाफेड पिंपळवाडी , भोगलेवाडीत श्रमदानातून बंधारा

ग्रामपंचायतीच्या नियोजनातून लोकसहभाग
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 08, 2026 10:29 AM
views 45  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : देवगड तालुक्यातील चाफेड पिंपळवाडी व भोगले वाडी येथे श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला आहे.पाणीटंचाईवर ग्रामपंचायतीच्या वतीने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या नियोजनातून व लोकसहभागातून हा बंधारा बांधण्यात आला आहे.यामुळे विहिरी व कूपनलिकांची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

आगामी काळात दुष्काळ व संभाव्य पाणीटंचाईची तीव्र समस्या भेडसावू नये, यासाठी चाफेड ग्रामपंचायतीच्या वतीने पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला.या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून गावातील पाणीप्रश्न सुटण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमित साटम यांच्या माध्यमातून मोफत जेसीबी उपलब्ध झाला.उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध पावले उचलत या बंधाऱ्याची उभारणी केली. या उपक्रमात लोकसहभाग आणि श्रमदानाचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.या श्रमदान व बंधारा उभारणी प्रसंगी सरपंच साहिल पांचाळ ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ यांच्यासह ग्रामस्थ व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.