
देवगड : समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या महिलांच्या त्यागाची, संघर्षाची आणि कर्तृत्वाची दखल घेणारा ‘सन्मान नवदुर्गांचा’ हा उपक्रम म्हणजे स्त्रीशक्तीचा गौरव करणारा हृदयस्पर्शी सोहळा ठरला. केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता, समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याला या उपक्रमातून सन्मानपूर्वक सलाम अनेकदा प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून समाजासाठी कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाले.त्यांना प्रदान करण्यात आलेला सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची पोचपावती असल्याची भावना यावेळी डॉ. तन्मय आठवले आणि डॉ. रिया जैन आठवले (देवगड मेडिकल फाउंडेशन) यांनी व्यक्त केली.
डॉ. तन्मय आठवले आणि डॉ. रिया जैन आठवले (देवगड मेडिकल फाउंडेशन) यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, युथ फोरम देवगडच्या सर्व सदस्यांचे, विशेषतः महिला सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.एका सुंदर संकल्पनेतून साकारलेल्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे अनेक महिलांच्या जिद्दीला, स्वप्नांना आणि सामर्थ्याला सन्मान मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे आणि समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करणारे असे उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
ताजी बातमी
View all










