LIVE UPDATES

सावंतवाडी शहरातील मोकाट गुरांना जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरु

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 28, 2026 20:02 PM
views 19  views

सावंतवाडी : भारतीय प्राणी कल्याण मंडळ यांच्या पत्रानुसार पावसाळा व नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्राण्यांच्या संरक्षणासाठी सर्व नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संस्था यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे नमूद केलेले आहे. यानुसार शहरातील मोकाट गुरांना नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात जेरबंद करण्यासाठी आजपासून मोहीम हाती घेण्यात आली आहे

या पत्राच्या अनुषंगाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार सावंतवाडी शहरातील मोकाट गुरे यांना नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात जेरबंद करण्यासाठी आजपासून मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत व मुकादम शेखर मेहत्तर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तरी या मोहिमेच्या अनुषंगाने सावंतवाडी शहरातील सर्व गुरेमालकांनी आपल्या मालकीची गुरे शहरात मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर फिरताना आढळल्यास गुरांची नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात व्यवस्था करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.