LIVE UPDATES

बोडदे शाळेचा गणित संबोध परीक्षेत १०० टक्के निकाल

चारही विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; गावात समाधानाचे वातावरण
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 08, 2026 12:47 PM
views 52  views
#kokansadlive#news update#konkan update#

बोडदे : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बोडदेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा निकाल तब्बल १०० टक्के लागला आहे.या परीक्षेत शाळेतील कु. तन्मय तुकाराम सावंत, कु. सार्थक रामचंद्र गवस, कु. शुभ्रा रामलिंग पाटील व कु. जान्हवी रुपेश घाडी या चारही विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे बोडदे गावात समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या पालकांचे व शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभल्याने हे यश मिळाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी नाईक, उपाध्यक्ष शितल गवस, श्री. फटी नार्वेकर, श्री. महादेव गवस, सौ. दिपिका घाडी, सौ. सुजाता गवस, तसेच मुख्याध्यापक श्री. महेश नाईक, श्री. गोपाळ पाटील, श्रीमती मंजुश्री परब आणि केंद्रप्रमुख श्री. दत्ताराम दळवी साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

तसेच विद्यार्थ्यांनी आगामी परीक्षांमध्येही उत्तम कामगिरी करून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी सर्वांनी त्यांना पुढील परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.