LIVE UPDATES

सामाजिक कार्यकर्ते संतोष धोंडू बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 29, 2026 15:40 PM
views 57  views

वैभववाडी : सामाजिक कार्यकर्ते संतोष  बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त जय मल्हार दुर्गोबा मंडळ आचिर्णे, धाऊ बयाजी गोरे ट्रस्ट आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी ३०ऑगस्टला सकाळी ९ ते दुपारी ३या वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे.

रक्तदान हे श्रेष्ठदान असून, या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक योगदान देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

“रक्तदान हेच खरे जीवनदान” या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी प्रेरित करण्यात आले आहे.या शिबिराला  तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन जय मल्हार दुर्गोबा मंडळ, धाऊ बयाजी गोरे ट्रस्ट आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.