LIVE UPDATES

रत्नागिरीत भाजपचा जम्बो पक्षप्रवेश सोहळा

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 18:45 PM
views 46  views

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण आणि उत्तर) पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्ता मेळावा बुधवारी 17 रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत  रत्नागिरी येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात झाली. त्यानंतर शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण शहर अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष रतन पवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या प्रयत्नातून भाजपला बळ मिळाले आहे.

यावेळी माजी आमदार तथा प्रभारी योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस व आमदार निरंजन डावखरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रमोद जठार, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय नातू, माजी आमदार व ज्येष्ठ नेते सूर्यकांत दळवी, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सौ. सुप्रिया उतेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजीत गुरव, रत्नागिरी उत्तर चे जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, देवरूखच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, गुहागरच्या नगराध्यक्ष नीता मालप, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष सुनील तिवरेकर, भाजपच्या जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव यांच्यासह भाजपच्या सर्व मोर्चाचे अध्यक्ष, सर्व मंडलांचे अध्यक्ष व मंडळाचे प्रभारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          प्रवेशकर्त्यांमध्ये उबाठाचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तसेच चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष रतन पवार, राष्ट्रवादीचे चिपळूण शहर उपाध्यक्ष राकेश दाते, शहर उपाध्यक्ष गणपत काळे, शिवसेनेचे शाखाप्रमुख प्रमोद इटले, ॲड. अश्विनी बेलोसे, चिपळूणच्या माजी नगरसेविका संजीवनी शिगवण, श्री. संजय शिगवण, काँग्रेसच्या चिपळूण महिला शहराध्यक्ष विणा जावकर, आखले शाखाप्रमुख अनंत वारोसे, गुरंबाडच्या माजी सरपंच नम्रता कवळकर, मुरडव ग्रामपंचायत सदस्य मुकेश चव्हाण, माजी सरपंच नितीन मेणे, कळंबुशी उपशाखाप्रमुख प्रमोद चव्हाण, तेजकुमार टक्के (ताम्हाणे), नांदळज माजी तंटामुक्ती अध्यक्ष नितीन डोंगरे,  माजी सरपंच विलास गोवळकर, कालुस्ते ग्रामपंचायत सदस्य दाऊद जबले, डॉ. श्रीकांत शेरे (चिपळूण), शिवसेना महिला संघटक रेशमा पवार, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सदस्य प्रिया भुवड,    रिया शिंदे (तीनवड, चिपळूण), सुशील कदम, रोहन जाधव, निलेश जाधव, समीर सागवेकर, राकेश कदम, केवल घाग, कुणाल घाग, विजय वारणकर, निलेश वारणकर (सर्व आकले गुरववाडी), दत्ताराम गावडे (शेनवडे), काशिनाथ बेटकर (शेनवडे), बाळकृष्ण लाखण (शेनवडे), दीपक निवाते (चिपळूण), अब्दुल शेख (गोवळकोट, चिपळूण), शाहिद शेख (गोवळकोट, चिपळूण), अभिजित शिंदे (खेड), युगंधरा शिंदे (खेड) यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.