LIVE UPDATES

‘गोविंदा’च्या जयघोषात विशाल परब यांचे श्रीकृष्ण दर्शन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 19:51 PM
views 18  views

सावंतवाडी : जन्माष्टमीनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी शहरातील विविध ठिकाणी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. घरोघरी जात त्यांनी गाठीभेटी देत श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.

यावेळी सावंतवाडी येथील पुरातन मुरलीधर मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तसेच शहर मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, क्रीडा सभापती आनंद नेवगी, ओबीसी मंडल अध्यक्ष धीरेंद्र म्हापसेकर आणि नगरपालिका आरोग्य अधिकारी दीपक म्हापसेकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत केतन आजगांवकर, श्रीकांत राजाध्यक्ष आदी उपस्थित होते.