
दोडामार्ग : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दोडामार्ग येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोविंदा पथकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उत्सवाला भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी विशेष भेट देऊन उपस्थित गोविंदा पथकांना आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या परंपरेचे महत्त्व विषद करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष दिपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पंचायत सदस्य संजय सातार्डेकर, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, ओबीसी जिल्हा चिटणीस आनंद तळवणकर, सरचिटणीस भैय्या पागंम, शहर अध्यक्ष राजेश फुलारी, प्रकाश गवस, मिडिया प्रमुख शिरीष नाईक, समीर लोंढे, नगरसेवक समीर रेडकर, पांडुरंग गवस, राज बोंद्रे, सुमित म्हाडगुत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर गोविंदा आला रे... च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.










