LIVE UPDATES

स्वयंचलित चाचणी केंद्राचे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 12:28 PM
views 76  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे स्वयंचलित चाचणी केंद्राचे (एटीएस) उद्घाटन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी केंद्राच्या कार्यपद्धतीची माहिती घेत स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या वाहन चाचणी प्रक्रियेची पाहणी केली.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहनांची चाचणी अधिक अचूक, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने करण्याच्या दृष्टीने स्वयंचलित चाचणी केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून वाहन चाचणी प्रक्रियेत स्वयंचलित यंत्रणेचा वापर करण्यात येत असल्याने चाचणीतील अचूकता आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच वाहनांची तांत्रिक स्थिती तपासण्याच्या प्रक्रियेला आधुनिक स्वरूप मिळणार आहे.

उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केंद्राच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून स्वयंचलित चाचणी यंत्रणेची कार्यपद्धती आणि वाहन चाचणी प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे विजय काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जि. प. सदस्य सुप्रिया वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.